प्रा. वैभव खानोलकर यांचा अध्यापक भास्कर पुरस्काराने गौरव

ओटवणे (प्रतिनिधी)      खानोली गावचे सुपुत्र आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे अध्यापक प्रा. वैभव खानोलकर यांना फरा प्रतिष्ठानचा मानाचा समजला जाणारा अध्यापक भास्कर पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण गुरूपौर्णिमे दिवशी जेष्ठ चित्रकार दिलिप देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा.वैभव खानोलकर हे शिक्षण क्षेत्रातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व, विद्यार्थी वर्गात सर्वात आवडते शिक्षक म्हणून त्यांच्या कडे विद्यार्थ्यांचा कल असतो.

मराठी विषयावर असणारे कमालीचे प्रभुत्व,त्याच बरोबर विविध विषयांचा व्यासग, शिकवण्याची पद्धत या बरोबरच सह शालेय उपक्रमातून वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन,काव्यलेखन, चित्रकला, नृत्य, अभिनय,खेळ , आदी क्षेत्रात खानोलकर सरांनी मुलांना केवळ व्यासपीठच मिळवून दिल नाही तर मुलांकडून मेहनत करून घेत अनेक स्पर्धात मुलांना यश मिळवून दिल.प्रा.खानोलकर स्वतः एक उत्तम वक्ते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक आणि राज्यात त्यांना युवा व्याख्याते म्हणून निमंत्रित केले जाते.आणि आपल्या मुलांनी ही व्यासपीठावर जाव त्यांनी आपल्या वक्तृत्वाने मन जिंकावी यासाठी ते नेहमी तळमळीने काम करत असतात.दशावतार कलाक्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.यात त्यांचा हातखंडा आहे.भजनी कलाकार, दशावतार कलावंत अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या त्यांनी प्रहार चॅनेल वरून घेतलेल्या अभ्यासपूर्ण मुलाखती अनेकांना दिशादर्शक आणि काहींच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत.

विविध विषयांवर ते सातत्याने लिखाण करत असतात, त्यांनी लिहिलेल्या सडेतोड लेख अनेकाना प्रेरणा देतात, स्पष्टवक्तेपणा, अभ्यास पुर्ण मांडणी आणि त्याची भाषाशैली यामुळे त्यांचे लेख वाचनीय तर असतात त्याच सोबत नाविन्यपूर्ण असतात.

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, डॉ प्रकाश आमटे, अभिनेत्री वर्षा उसगावकर,

सुनिल गोडबोले, पद्मश्री नयना आपटे,विजय पाटकर, दिंगबर नाईक, किशोरी आंबिये, अरूण नलावडे,अनिल गवस, आदी सिनेस्टारनी त्यांच्या प्रभावी सुत्रसंचलनाची दखल घेत त्याची वेळोवेळी वाहवा केली आहे.

एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील चौफेर सफर करताना विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्रा वैभव खानोलकर यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल अध्यापक भास्कर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, गौरव लोगो, ज्ञानेश्वरी गौरव ग्रंथ,शाल आदी असुन अध्यापन भास्कर पुरस्कार खानोलकर यांना प्रदान करताना व्यासपीठावर फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई सह मान्यवर उपस्थित होते.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालय आणि संस्था पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने खानोलकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.