भाजपाच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्याच्या जागतिक गौरवाचा जल्लोष; हनुमान मंदिरात पार पडला विशेष कार्यक्रम
विजयदुर्ग : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यात विजयदुर्ग किल्ल्याचाही समावेश झाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजयदुर्ग येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निर्णयामुळे शिवप्रेमी, कोकणवासी आणि महाराष्ट्रवासीयांनी अभिमान व्यक्त केला.
हा कार्यक्रम १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता विजयदुर्ग येथील हनुमान मंदिरात पार पडला. पडेल आणि देवगड मंडल यांच्यावतीने एकत्रितपणे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. यामध्ये अजित गोगटे, बाळा खडपे, बंड्या नारकर, राजा भुजबळ, आरिफ बगदादी, संजना आळवे, शरद ठुकरुल, वैभव करंगुटकर, रवि पाळेकर, बाळा गावकर, बापू जुवाटकर, व्हिसी खडपकर, श्री. राणे, सुभाष धुरी, विनोद सुके तसेच विजयदुर्ग व गिर्ये येथील सरपंच यांचा समावेश होता.
जय शिवरायच्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात विजयदुर्गच्या जागतिक वारसा यादीतील समावेशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आणि भविष्यात किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. हा सोहळा भाजपा पक्षाच्या नेतृत्वाखाली अभिमानाचा व शिवप्रेमाचा संगम ठरला.









