वेंगुर्ले येथे आम.दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त १७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तथा आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त वेंगुर्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना, वेंगुर्ला व युवासेना आणि महायुती पुरस्कृत आणि रक्तदान क्षेत्रातील अग्रणी संस्था वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला आणि समर्पण फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर गुरुवार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमामागील उद्देश सामाजिक बांधिलकी जपत, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी योगदान देणे हा आहे. युवकांनी व नागरिकांनी तसेच दीपक भाई प्रेमी यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि नाव नोंदणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर (९९२२५४०४५४) , शहर प्रमुख उमेश येरम (९४२२४३४४५८), रक्तमित्र संघटक महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने आणि शिवसेना, युवासेनेच्या वतीने जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.