आदर्श तबला क्लास कणकवलीचा 20जुलै रोजी गुरु पूजन सोहळा

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

आदर्श तबला क्लास कणकवलीचा गुरुपूजनाचा सोहळा *रविवार दिनांक 20 जुलै 2025* *रोजी दुपारी ठीक ३:००वाजता तेलीआळी येथील तबला क्लासमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते

दीप प्रज्वलनाने होणार आहे. त्यानंतर विद्यालयाचे आद्य गुरु कै.वामनराव काराणे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन.,गुरुवर्य कदम सर यांचे पाद्यपूजन

मान्यवरांचे स्वागत व सन्मान.

विद्यार्थी पालक यांची मनोगते.

विद्यार्थी कलाकारांचे तबला वादन,सादरीकरण होणार आहे

तरी या सोहळ्यासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थी पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श तबला क्लास तर्फे करण्यात आले आहे.