गुहागर l प्रतिनिधी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवनगर मराठी येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कोळथरकर होत्या .गोपाळगड किल्ल्याच्या उभारणीमध्ये कान्होजी आंग्रे यांचा मोठा सहभाग होता.त्यावेळी वेलदूर ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ शंकरजी कोळथरकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पाताई कोळथरकर ,उपाध्यक्ष रवींद्र जांभरकर ,सामाजिक कार्यकर्ते तुषारजी पालशेतकर, डॉ मनोज पाटील ,माजी उपाध्यक्ष सुरक्षाताई रोहीलकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार ,धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला ,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .त्यावेळी बोलताना धन्वंतरी मोरे मॅडम म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या महत्त्वाची जाण ठेवून आरमार उभारले, पण त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकारण्याचे काम कान्होजी आंग्रे यांनी केले.त्यांच्या पराक्रमाने मराठ्यांचा भगवा झेंडा केवळ सह्याद्रीच्या डोंगररांगावरच नव्हे तर हिंदी महासागराच्या लाटावरही अभिमानाने फडकू लागला .तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरकर यांनी कान्होजी आंग्रे यांचा कार्य विशद करताना सांगितलं की कोकण किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग ,सिंधुदुर्ग ,अंजनवेल येथील गोपाळगड ,कुलाबा यासारखे अभेद्य किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या सहकार्याने उभारले गेले.मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की कान्होजी आंग्रे म्हणजे मराठा साम्राज्याच्या सागरीशक्तीचा महापर्व होय .कान्होजी आंग्रे यांच्यामुळे इंग्रज ,पोर्तुगीज, डच या शत्रूला शह बसला होता.शिवाजी महाराज यांनी मराठा नौदलाच्या सरखेल नौदल प्रमुख पदावर कान्होजी आंग्रे यांना 1698 सालामध्ये नेमले होते.ते आरमाराचे खऱ्या अर्थाने समुद्रातील योद्धा व धारकरी होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.













