गौरव पोंक्षे l माखजन : १४ रोजी रात्री पासून पडणाऱ्या संततधार पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेला बसला आहे.गडनदीच्या पूराचे पाणी थेट माखजन बाजारपेठेत घुसल्याने व्यापाऱ्यांची पळापळ झाली.गेले आठ दिवस उसंत घेऊन पडणाऱ्या पावसाने अचानक रौद्र रूप धारण केले.यामध्ये मालाची हलवाहलव करे पर्यंत,काही माल पाण्यात भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गदनदीला पूर आल्याने माखजन कासे पुलाच्या दुतर्फा पाणी आले होते.यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.शाळकरी मुलांना शाळेत येणे जाणे जिकिरीचे झाले होते.पुराच्या पाण्याखाली भातशेती गेल्याने भात शेतीचे देखील नुकसान झाले आहे.










