दापोलीत विज्ञान दिन उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनने विद्यार्थांसाठी प्रा. डी. डी. कुलकर्णी (भौतिकशास्त्र विभाग प्रमुख) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तसेच महाविद्यालयातील सुक्ष्मजीव विभागाने सायन्स फन फेअर चे आयोजन केले होते.
व्याख्याना दरम्यान विद्यार्थांना मार्गदर्शन करताना प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन हा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांनी ज्या दिवशी रामन इफेक्ट हा शोध जगासमोर मांडला त्या दिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितले व त्या प्रयोगाची विस्तृत माहिती विद्यार्थांना दिली.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन सायन्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. संतोष मराठे यांनी केले.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने सायन्स फन फेअर चे आयोजन केले होते. यामध्ये सापशिडी सारखे छोटे खेळ, कोडी यांच्या माध्यमातून विज्ञानातील अनेक संकल्पना सर्वसामान्य लोकांना समजतील अशा स्वरूपात मांडल्या होत्या.
हे सायन्स फन फेअर यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. प्रियांका साळवी, इतर शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले