गुहागर प्रतिनिधी :
दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शिवतेज फाऊंडेशन गुहागरच्या वतीने दिपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी संध्याकाळी शहरातील गांधी चौक, बाजारपेठ येथे एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी निवृत्त माजी सैनिक प्रताप शिर्के यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.
टिव्ही वर किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता आपण गूहागरवासीय जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र येत गुहागरवासीयांनी प्रत्येकवर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते. विशेष म्हणजे पर्यटनासाठी आलेले पर्यटक देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी गुहागर नगरपंचायातीच्या नगराध्यक्षा सौ. नीता मालप, उप नगराध्यक्ष प्रदीप बेंडल, माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनीष खरे, शैलेद्र खातू, निखिल तांबट, सचिन मुसळे, डॉ. अनिकेत गोळे, गुहागर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष मनोज बावधनकर, ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या सीमा बहेनजी, शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, निलेश गोयथळे, संतोष वरंडे, श्री. गणेश धनावडे, श्री. विकास मालप, सुधाकर कांबळे, श्री. प्रभुनाथ देवळेकर, श्रद्धा घाडे, ऍड. सुप्रिया वाघधरे, सारिका कनगुटकर, शीतल साळवी आदिसह शहरवासीय उपस्थित होते.













