पुराचे पाणी जवाहर चवाहरचौकात शिरण्याच्या शक्यतेने व्यापारी नागरिक सतर्क
राजापूर (वार्ताहर): गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आला असून अजुर्ना आणि कोदवली नद्यांनी आपली ईशारा पातळी ओलांडली आहे. तालुक्यात मंगळवारी सरासरी ८५.८७ मि मि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत.
कोदवली व अजुर्ना नद्यांनी ईशारा पाततळी ओलांडली असल्याने प्रशासनाकडून नदीकिनाऱ्यालगतच्या नागरीक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर वरचीपेठ चिंचबांध मार्ग व बंदरधक्का परिसर अर्जुना नदीतील पुंडलिक मंदिर परिसरही पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर शिळ गोठणे दोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे.
काहिशा विश्रांतीनंतर गेल्या दोन पासून राजापूर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी नदी नाले भरून वाहत असून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नदया दुथडी भरून वाहू लागल्या असून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोदवली नदीच्या पात्र भरून वाहून लागल्याने जवाहरचौक परिसरात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने व्यापारी व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.










