धवडकी येथून रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील धवडकी येथे मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गणपत मोहनशेट कोरगावकर (वय ४६, रा. धवडकी) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की १६ जुलै रोजी रात्री १ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कोरगावकर यांच्या घरासमोर उभी असलेली ( एम एच ०७ एस ५४८० ) क्रमांकाची रिक्षा अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. रिक्षाची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे.

दरम्यान, या प्रकरणी गणपत कोरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सावंतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.