सावंतवाडी । प्रतिनिधी :
स्वच्छ सर्वेक्षण NAMASTE (National Action for Mechanized Sanitation Ecosystem) या योजनेअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषद, सिंधुदुर्ग येथे आज ‘NAMASTE’ दिवसाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी श्री. अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसह लाभार्थ्यांमध्ये या योजनेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘NAMASTE’ योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, नगरपरिषद अंतर्गत सेप्टिक टँक क्लिनिंग कर्मचाऱ्यांना (Septic Tank Cleaning Worker) पीपीई किट (PPE Kit) वितरित करून सन्मानित करण्यात आले. यामुळे त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित होऊन त्यांना प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘NAMASTE’ योजनेच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची सुनिश्चिती केली जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आधुनिक साधनांनी सुसज्ज करण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.












