दापोली किनाऱ्यावर ५.४५ कोटींचा अंबरग्रीस जप्त

कस्टम विभागाची कारवाई; व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किमंत; प्रकरणात एकही अटक नाही 

दापोली  – दापोली तालुक्यातील गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ १२ ऑगस्ट रोजी समुद्रकिनाऱ्यावर “पांढऱ्या-हलका तपकिरी रंगाचा, अत्यंत चिकट जेलीचा गोळा” आढळून आला. दापोली कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या निर्देशानुसार, अधीक्षक (पी अँड आय) अतुल व्ही. पोतदार व अधीक्षक (हरनाई) विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोध मोहीम राबवली. तपासात तो पदार्थ ‘अंबरग्रीस’ (व्हेल वोमिट) असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत ४ किलो १४० ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आला असून, त्याची राखाडी बाजारातील किंमत सुमारे ५.४५ कोटी रुपये आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसून पुढील तपास सुरू आहे.

सीमाशुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, अशा पदार्थाचा शोध लागल्यास तात्काळ विभागाला कळवावे किंवा ८७९६८९५९९० या क्रमांकावर संपर्क साधावा. बेकायदेशीर ताबा अथवा व्यापार आढळल्यास सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.