वैभववाडीत २० ते २२ जुलै कालावधीत रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन 

प्राथमिक शिक्षक समिती स्थापना दिनानिमित्त वैभववाडी शाखेचे आयोजन 

वैभववाडी l प्रतिनिधी : “त्याग व सेवा तसेच न्यायाची चाड व अन्यायाची चीड” हे ब्रीदवाक्य अंगीकारत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६३ व्या स्थापना दिनानिमित्त वैभववाडी शाखेच्या वतीने दिनांक २० ते २२ जुलै २०२५ दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै हा शिक्षक समितीचा स्थापना दिन आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे २० जुलै रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन. यासाठी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचेही सहकार्य लाभणार आहे.

. २१ जुलै रोजी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना तर २२ जुलै रोजी, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच वृक्षारोपणही करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या सर्व उपक्रमांत सर्व शिक्षक बंधू भगिनी व नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा वैभववाडीचे अध्यक्ष विवेकानंद कडू, सचिव प्रफुल्ल जाधव, महिला सेल अध्यक्ष दिव्या भोसले, सचिव वेलांकनी गुरव, कार्याध्यक्ष संतोष भरडकर, कोषाध्यक्ष राजाराम कात्रे, शिक्षक नेते सुनील चव्हाण, सुरेंद्र साळुंखे, पतपेढी संचालक संतोष मोरे, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडीचे तालुकाध्यक्ष राजू पडवळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.