हडी येथे एसआरआय पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण !

मसुरे | झुंजार पेडणेकर :                   UNDP GCF व तालुका कृषी अधिकारी मालवण यांच्या वतीने “SRI पद्धतीने भात लागवड शेतकरी प्रशिक्षण” हडी गडगेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास हडीचे सरपंच श्री. प्रकाश तोंडवळकर , ग्रामपंचायत सदस्य श्री. आनंद रावले, श्रीम. सायली मिठवबावकर , श्रीम. प्रज्ञा सुर्वे , पोलिस पाटील श्रीम. तृप्ती हडकर , श्री. जान्हवी पांजरी व चारही महसूली गावातील शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास UNDP तालुका प्रकल्प समन्वयक श्री. आशिष जाधव यांनी UNDP green climate fund विषयी माहिती दिली. तालुका पीकविमा प्रतिनिधी श्री. प्रणिल नार्वेकर यांनी प्रधान मंत्री पीकविमा योजना याविषयी लागणारे कागदपत्र , अटी , पिक पाहणी याविषयी माहिती दिली. कृषीसेवक आचरा श्री. राधेशाम डाखोरे यांनी PM किसान योजना , फॉर्मर आयडी , महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना याविषयी माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अश्विन कुरकुटे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. हडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री. किशोर नरे यांनी पारंपरिक पद्धतीनं भात लागवड आणि SRI पद्धतीने भात लागवड यातील फरक समजावून सांगितला. SRI पद्धतीनं लागवड केल्यावर होणारे फायदे आणि त्याद्वारे वाढणार उत्पन्न याविषयी माहिती दिली. पद्धतीचे वैशिष्ट्ये समजावून सांगताना त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी ही माहिती दिली.कृषीसेवक हडी श्री. विवेक रंगे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना,अटी, लागणारी कागदपत्रे आणि महा DBT अंतर्गत येणाऱ्या विविध योजना त्यातून मिळणारे अनुदान आणि त्यासाठी कसा अर्ज करावा याविषयी माहिती दिली.