कट्टा येथे पुस्तकाने मला काय दिले?स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आचार्य पार्वतीकुमार व भाऊ गुराम स्मृतिप्रित्यर्थ आयोजित पुस्तकाने मला काय दिले?
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी दिलीप गुराम म्हणाले, माझ्या गावचे जगप्रसिद्ध गुरु आचार्य पार्वतीकुमार व माझे वडिल भाऊ गुराम स्मृतिप्रित्यर्थ ह्या स्पर्धा घेतल्या. याला खूप प्रतिसाद दिल्याबद्दल मुले व पालक यांचे खूप कौतुक वाटते. मुलानी असेच आनंदाने
शैक्षणिक कामात सहभागी होवून आपली
प्रगती करावी. सेवांगणला माझे नेहमीच सहकार्य राहिल
प्रारंभी दीपक भोगटे यांनी सेवांगणच्या उपक्रमाची माहिती दिली. जयंत नारळीकर याना आदरांजली म्हणून विज्ञाननिष्ठ नेते प्रा मधु दंडवते, छत्रपती शाहू महाराज व नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके वाचनासाठी दिली. त्या पुस्तकावर
पालक व विद्यार्थी यानी संयुक्तपणे
अभिप्राय लिहून भाग घेतल्याबददल सर्वांचे खूप कौतुक केले. व नेहमीच पालकानी सहकार्य करावे असे आवाहन केले.
सुनिल नाईक यानी सेवांगण कट्टा गेली अनेक वर्षे शैक्षणिक उपक्रम राबवत असून त्याचा चांगला परिणाम परिसरातील शाळाना झाला असून शाळांची गुणवत्ता वाढली आहे.
सुनील गुराम यानी मुलाना कसे वागावे याचे उचित मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे मनिष चंद्रना चाटर्ड अकाऊंटंट यानी दिलीप गुराम यांचे व्यक्तिमत्व साकारणारी सुंदर कविता सादर केली.
वैष्णवी लाड यांनी पार्वतीकुमार यांचे चरित्र मुलाना सांगितले. तसेच सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
यावेळी दिलीप गुराम यानी गावातील मान्यवर व सेवांगणचे कार्यकर्ते यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
तसेच स्पर्धेतील व सहभागी ५० विद्यार्थी यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रत्येक मुलाला १०० रु चे कूपन शैक्षणिक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी देण्यात आले.
या कार्यक्रमास दिलीप रामचंद्र गुराम,
मनिष चंद्रना, सुनील नाईक, सुनील गुराम,श्रध्दा नाईक, बापू तळावडेकर,
दीपक भोगटे, संपदा भाट, वैष्णवी लाड, दिलीप खोसला, कमलेश राऊत,
शोभा म्हाडगुत, स्मिता गुराम, सोनाली भोजणे, श्रीकांत भोजणे, गुंजन राऊत,
संपदा भाट, बाळकृष्ण गोंधळी, बाळू राणे,
रिया जांभवडेकर, अर्चना धुत्रे, परिसरातील शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.












