रत्नागिरी जिल्ह्यात आज सरासरी १५.११ मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, १८ जुलै २०२५ रोजी सकाळपर्यंत सरासरी १५.११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेला पाऊस खालीलप्रमाणे (मिमी मध्ये):
* मंडणगड – १०.५०
* खेड – २८.००
* दापोली – ९.२८
* चिपळूण – २६.७८
* गुहागर – ७.६०
* संगमेश्वर – २२.७५
* रत्नागिरी – ८.५५
* लांजा – १०.२०
* राजापूर – १२.३७
आज जिल्ह्यात एकूण १३६.०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मान्सून सक्रिय असून, पुढील काही दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.