आदिवासी पाड्यावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून औषधोपचार करणार .
शंकर वैद्य साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान कार्यक्रमांतर्गत मोबाईल मेडिकल युनिटने भेट दिली.
पुर्ये तर्फे देवळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. संजीव चव्हाण यांनी युनिटचे स्वागत केले. यावेळी युनिटचे प्रमुख डॉ. खाडे मॅडम, औषध निर्माण अधिकारी जुई नरोटे, आरोग्य विस्तार अधिकारी पुजारी , प्राथमिक आरोग्य केंद्र देवळेचे सुपरवायझर प्रशांत कांबळे, आरोग्य कर्मचारी शशी कांबळे, शिल्पा राव, आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सदर युनिटने ग्रामीण दुर्गम भागात तसेच आदिवासी पाड्यावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून औषधोपचार करणार आहेत. त्यामुळे जनतेला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांचे वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपसरपंच श्री. संजीव चव्हाण यांनी आभार मानले आणि पुढील कार्यवाहीसाठी शुभेच्छा दिल्या.













