सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शिबीरात ९३ दात्यांचे रक्तदान

बांदा : प्रतिनिधी 

 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेकडो रुग्णांचे प्राण जातात. रक्त संकलन करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची त्रेधातिरपीट उडते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बांदाचा सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, आनंद नार्वेकर, सुधीर वराडकर, संजय पिळणकर, उपसरपंच आबा धारगळकर, ग्रा. पं. सदस्य रूपाली शिरसाट, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, रिया येडवे, साई काणेकर, जावेद खतीब, श्याम मांजरेकर, बाळू सावंत, बाळा आकेरकर, मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, सचिव दादा पावसकर, खजिनदार भाऊ वाळके उपस्थित होते.

 

यावेळी प्रकाश तेंडोलकर यांनी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. शिबीरात एकूण ९३ जणांनी रक्तदान केले. तसेच तिघांनी देहदान व चार जणांनी अवयव दानाचे अर्ज भरले.

 

मान्यवरांचे स्वागत सर्वेश गोवेकर, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, निलेश कदम, ज्ञानेश्वर येडवे, निखिल मयेकर, प्रसाद वाळके अर्णव स्वार, अक्षय मयेकर, ऋषी हरमलकर, प्रथमेश गोवेकर, गौरव नाटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राकेश केसरकर यांनी मानले. रक्त संकलन करण्यासाठी गोवा बांबोळी व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीची टीम कार्यरत होती. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राकेश केसरकर यांनी मानले.

———–