रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आज, 18 जुलै 2025 रोजी सकाळी 04.00 वाजल्यापासून “ऑल आऊट ऑपरेशन” राबवले. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार व अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या पार पडले.
या “ऑल आऊट ऑपरेशन” मध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी.बी. महामुनी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने, आणि पेरिपोलीस उपविभागीय श्री. शिवप्रसाद पारसे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे हे स्वतः उपस्थित होते. एकूण 10 पोलीस निरीक्षक, 33 सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक आणि 28 पोलीस अंमलदार यांनी रात्री सहभाग घेतला.
या अभियानादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिक्स पॉईंट 16, पेट्रोलिंग 5, कॉम्बिंग 00 आणि नाकाबंदी 32 अशा कारवाया करण्यात आल्या.
याव्यतिरिक्त, विविध गुन्हेगारी कारवायांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले. यामध्ये मोटार वाहन केसेस 11, केबल चोरी उपद्रव 07, NDPS केसेस 07, म.पो.क. 122 अंतर्गत 01 कारवाई करण्यात आली. फरार आरोपींपैकी 07 जणांना तपासण्यात आले व 11 जण मिळून आले. गुन्हेगार हिस्ट्रीशीटरपैकी 14 जणांना तपासण्यात आले व 13 जण मिळून आले. तसेच, माहितीगार गुन्हेगारपैकी 20 जणांना तपासण्यात आले व 16 जण मिळून आले.
इतर तपासणी मोहिमांमध्ये 03 NBW, 06 BW आणि 11 समन्स बजावण्यात आले. वाहने 02, व्यक्ती 01, लॉज 01, हॉटेल/धाबे 03, बँक 11, ए.टी.एम. 10, मंदिर/मशिद 11 आणि लॅण्डिंग पॉईंट 03 असे तपासण्यात आले.
चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये 01 केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे 01 अंमलदार संदर्भात कारवाई करण्यात आली आहे.
हे “ऑल आऊट ऑपरेशन” रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या कटिबद्धतेचे प्रदर्शन करते.










