दोडामार्ग : सुहास देसाई
तालुक्यात मांटणे येथील घटना ताजी असताना आज घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कुडासे धनगरवाडी येथील मनोहर बाबली कुडासकर यांचे घर अज्ञात चोरट्यानी फोडले यात साडेतीन लाखाचे दागिन्यासह 8 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटने बाबत कुडासकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे
सविस्तर वृत्त असे की,अशिकी कुडासे धनगरवाडी येथील मनोहर कुडासकर हे शनिवारी सकाळी आपल्या पत्नी सह शेतात काम करण्यासाठी गेले होते व मुलगा खत आणण्यासाठी बाजारपेठेत गेला होता. शेतात जात असताना दरवाजाला कुलूप करून चावी बाहेरील अंगणात ठेवली यावेळी अज्ञात चोरट्यानी बाहेर ठेवलेली चावी घेऊन कुलूप काढून घरातील कपाट उघडून अडीच तोळ्याचे मांगळसूत्र, व एक टोळ्याची चेन व रोख रक्कम 8 हजार रुपये रक्कम घेऊन घराच्या मागच्या दरवाजाने पळ काढला. असल्याचे स्पष्ट झाले आहे

तालुक्यात माटणे येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या चोरीची घटना ताजी असताना कुडासे धनगरवाडी येथे चोरट्यानी केली आहे. कुलूप ची चावी काढून आत मधून दरवाजाला खिळी घालण्यात आली. व कपाटातील दागिने घेऊन घराच्या मागच्या दरवाजाने पळ काढला. यावेळी मोहन कुडासकर यांचा मुलगा घरी आला असता दरवाजाला कुलूप नव्हते त्यावेळी त्यांनी दरवाजा ढकलून पाहिले तर दरवाजा आतमधून बंद असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यावेळी त्यांनी घराच्या मागच्या दरवाजाने ते आत गेले. त्यावेळी त्यांना रूम मधील सामान अस्ता वेस्ता पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी कपाटात ठेवले दागिने पाहण्यासाठी गेले असता कपाटात दागिने नसल्याचे त्यांना निदर्शनास आले. यावेळी या वेळी त्यांनी दोडामार्ग पोलीस ठाणे गाठात अज्ञात चोरट्या वर तक्रार दाखल केली. यावेळी दोडामार्ग पोलीस घटना स्थळी जाऊन चोरीचा पंचनामा केला व अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करीत आहेत.
या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अशा चोरी प्रकारामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे












