लाचखोर तलाठ्याला पोलीस कोठडी

मालवण | प्रतिनिधी : वारस तपासासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मसुरे तलाठी निलेश दुधाळ याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

सिंधुदुर्ग लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा रचत चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी निलेश दुधाळ याला शुक्रवारी पकडले. रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.