अनिल परबांचे आरोप खोटे असल्याचे योग्यवेळी सिद्ध करेन- ना. योगेश कदम

दापोली l प्रतिनिधी*: पावसाळी अधिवेशनाची सांगता करतांनाच उद्वव ठाकरे गटाचे नेते आ. अनिल परब यांच्या रडारवर दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम राहिल्याचे पहायला मिळाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुंबई कांदिवली येथील डान्सबारवर केलेल्या पोलिसांनी कारवाईचा दाखला देत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचेवर गंभीर आरोप केला आहे.

 

 

अधिवेशनाच्या सुरुवातीला परबांनी वाळू कारवाई संबंधी आरोप केला होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुंबई कांदिवली येथील डान्सबारवर केलेल्या पोलिसांनी कारवाईचा दाखला देत हा डान्सबार ज्योती रामदास कदम यांच्या नावाचे परमिट असलेला आहे, असा आरोप अनिल परब यांनी सभागृहात करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.

 

अनिल परब यांनी केलेल्या गंभीर आरोपाला गृहराज्यमंत्री योगेश कदम हे प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल परब हे खोटे आरोप करत आहेत त्यांनी दिलेले पुरावे देखील खोटे आहेत. हे मी योग्यवेळी सिद्ध करून दाखवीन. केवळ राजकारण करण्यासाठीच सभागृहात खोटे आरोप राजीनामा मागायचा ही त्यांची कार्यपद्धती आहे. अनिल परब हे राजकीय सुडानेच आरोप करत आहेत. तुम्ही दिलेल्या आरोप दिलेले पुरावा हे खोटे आहेत हे आपण योग्य वेळी सिद्ध करून दाखवू अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.

 

दरम्यान, दापोली मतदारसंघातील अनिल परब व रामदास कदम यांचा वाद नवीन असा नसुन जुना आहे. आता अनिल परब यांनी केलेल्या आरोपाला आता गृहराज्यमंत्री योगेश कदम कसे खोडुन काढतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.