मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील वरवेली येथील मराठवाडी अंगणवाडीला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे (IAS) यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी अंगणवाडी सेविका सीमा गणेश किर्वे यांनी त्यांचे येथीचीत स्वागत करून त्यांचा महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या स्वागत गीताने अक्षरशा त्या भारावून गेल्या…. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताचे त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करून घेतले.विद्यार्थ्यांना लोकसहभागातून दररोज दूध व अंडी मिळत असून या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.ग्रामीण भागामध्ये देखील चांगला लोकसहभाग मिळत असून लोकसहभागातून अंगणवाडीला लाखो रुपयांचे साहित्यही उपलब्ध झाले असून ज्या दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास सहभाग दिला या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
अंगणवाडीमध्ये एकही बालक कुपोषित नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले.लहानग्या वयात सर्व विद्यार्थी खूप ऍक्टिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर तसेच
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती असलेली प्रसन्नता पाहून त्या मनमुराद खुश झाल्या.या सर्व लहानग्या विद्यार्थ्यांसमवेत त्यांना फोटो काढण्याचा मोह देखील आवरता आला नाही यावेळी.अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे अंगणवाडीतील एका विद्यार्थ्याने त्यांना भेट म्हणून दिलेले सोनचाफ्याचे फुल… त्यांनी आनंदाने स्वीकारले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव, कार्यकारी अभियंता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी अभिजीत गडदे, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर , मुख्य सेविका चैताली, हळये , वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य अरुण रावणंग, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, पत्रकार गणेश किर्वे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.










