खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या अधिकृत घोषणेकडेच कोकणवासियांच्या नजरा खिळल्या आहेत. ओडिसा-बालासोर येथे झालेल्या ३ रेल्वेगाड्यांच्या अपघातानंतर लोकार्पणाला गालबोट लागल्याने एक्सप्रेसचा प्रवास अजूनही रखडलेलाच आहे. प्राप्तं
माहितीनुसार, २७ जूनला मुंबई-मडगाव वंदे
भारत एक्स्प्रेससह ४ मार्गांवरील वंदे भारत
एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथून
हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
सद्यस्थितीत वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील वाडीबंदर
यार्डातच उभी आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाचा ३ जून रोजी मुहूर्त
ठरला होता तर जूनपासून एक्स्प्रेस नियमितपणे सेवेत दाखल होणार होती.
कोकण मार्गावर सज्ज असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य ४ मार्गांवर धावणाऱ्या वंदे
भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासाठी २७ जूनचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौराही आहे. याचवेळी
भोपाळ येथून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, बेंगलोर-हुबळी भोपाळ-जबलपूर, या ४ वंदे भारत एक्स्प्रेसनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवनार आहेत