खेड(प्रतिनिधी) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील
विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे. या मार्गावर धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या . ७ जुलै २०२४ पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शनऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ४ फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. येथील दहा, अकरा, बारा, तेरा या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या सेवेत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या सेवेतही बदल करण्यात केला आहे.
कोकण, रेल्वेमार्गावरील मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी (१२१३४), मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (२२१०२) तेजस एक्स्प्रेस, तसेच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटीदरम्यान रोज धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२) यो तीनही सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या ७ जुलै २०२४ पर्यंत दादरपर्यंतच धावणार आहेत.








