खुनाचा गुन्हा दाखल; भावकीतल्या वादातून भावाचा लोखंडी फरशीने खून

दापोली | प्रतिनिधी

उन्हावरे बौद्धवाडी येथे भावकीतील वादातून एका भावाने आपल्या सख्ख्या भावाचा लोखंडी फरशीने डोक्यात घाव घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रवींद्र गणपत तांबे (वय ४१, रा. उन्हावरे बौद्धवाडी) याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अन्वये २० जुलै २०२५ रोजी सकाळी ८.५७ वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संदीप मधुकर तांबे (वय ३८, रा. उन्हावरे बौद्धवाडी) यांच्या माहितीनुसार, मयत विनोद गणपत तांबे याने भावकीchya बैठकीत आपला सख्खा भाऊ रवींद्र याला अपशब्द वापरले होते. संबंध तोडले होते. यामुळे संतप्त झालेल्या रवींद्र तांबे याने १९ जुलै २०२५ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास विनोद तांबे यांच्या डोक्यात लोखंडी फरशीने वार केला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर संदीप तांबे यांनी दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.