रेल्वे प्रवासात झोपेचा फायदा घेत १६ हजारांचा मोबाईल चोरीला

चिपळूण | प्रतिनिधी

रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशाचा मोबाईल झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात २० जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजून १ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल केरू कांबळे (वय ३५, रा. डोंबिवली पूर्व) हे १९ जुलै रोजी रत्नागिरीहून चिपळूण रेल्वे स्थानकाकडे जात असताना १२१३४ सीएसएमटी एसएफ एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक S/सीट क्रमांक १९ वर झोपले होते. त्यांनी १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चार्जिंगला लावून सीटवर ठेवला होता.

झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर गुन्हा चिपळूण पोलिसांत वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.