लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या उपाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त शालेय दप्तरांचे वाटप

खेड (प्रतिनिधी) –
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उपाध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवित जिल्हा परिषद शाळा निगडे बोरज नं. २ येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, डॉ. मरकड, लायन संदीप मोरे, तसेच शिक्षक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली होती.

समाजसेवेची बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी सातत्याने अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अविनाश दळवी यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी समाधान व्यक्त केले असून, लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.