मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत उद्या नेत्र तपासणी शिबिर 

वैभववाडी l प्रतिनिधी :     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २२ जुलै रोजी नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिराचे आयोजन भाजपा वैभववाडीच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भाजपा कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

या शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.