एक राखी देशासाठी, एक राखी सैनिकांसाठी

*विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपचा उपक्रम

चिपळूण (प्रतिनिधी) : समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडून ३५६० राख्या सीमेवरील अनेक भागात सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देश सेवेविषयीची भावना वाढीस लागावी म्हणून भारतीय जवानांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठविण्याचा उपक्रम पंचक्रोशीतील आकले गावचे सुपुत्र, मुख्यप्रवृतक समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या माध्यमातून ३५६० राख्या सीमेवरील अनेक भागात सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
भारतीय जवानांना रक्षाबंधनला आपल्या मायभूमीत आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही. या विचाराने प्रेरित होऊन मुख्यप्रवर्तक समाजसेवक विनेश भाऊ मोहिते (सामाजिक विकास ग्रुप) यांच्या प्रेरणेने भारतीय जवानांना राखी पाठवण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहात चिपळूण तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला. हा एक अनोखा उपक्रम चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातून बचत गट कार्यालय तिवडी,ग्रामपंचायत आकले, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत खडपोली, न्यू इंग्लिश स्कूल खडपोली, युनायटेड स्कूल चिपळूण, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मिरजोळी या सहा ठिकाणी राबविण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्याना समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडून २०० अभिनंदन पत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य व मेहनत माजी सैनिक संभाजी चव्हाण, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, साद कडवेकर, राजेश कोकरे, सामाजिक सेवक प्रसाद वनगे, सुधीर मोरे, नितीन शिगवण, हेमंत जाधव, वैभव मोहिते, सचिन पवार, समीर कदम, अनिल पिनगे, विवेक जाधव, आकाश मोहिते, राहुल मोरे, राहुल कदम, राजेश यादव, पंचशील अध्यक्ष विशाल मोहिते यांनी दिवसभर नि:स्वार्थ सेवा केली. या राख्या देशाच्या मिशनवरील जवानांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुक्यात सर्वच ठिकाणी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक होत आहे.
देशाचे संरक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी ,मराठी शाळा, बचत गट, ग्रामपंचायत, महाविद्यालय, गुहागरमधील शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी, महिला वर्ग या सर्वांनी शाळा, गाव, बचत गटातून एक एक राखी घेऊन भगिनी मोट्या प्रमाणात आल्या होत्या. या उपक्रमाला तिवडी शाळेचे मुख्याध्यापक विजय वाघमोडे, अंगणवाडी सेविका शितल नरळकर, सरपंच संगीता पवार, ग्रामपंचायत आकलेचे सरपंच सुमित्रा कांगणे, ग्रामसेवक संजय बनगर,आकले तलाठी दीपक यादव,धनंजय गायकवाड,आकले ग्रामस्थ राजेंद्र देवरे, ग्रामपंचायत खडपोली सरपंच सारिका भुवड, उपसरपंच मंगेश गोटल,सदस्य महेश मोहिते सर्व सदस्य,न्यू इंग्लिश स्कूल खडपोली मुख्याध्यापिका विना चव्हाण,सर्व शिक्षक, युनायटेड स्कुल चिपळूण मुख्याध्यापक श्री.विभाकर वाचासिद्ध, मुख्याध्यापिका संगीता नाईक, जि.प.शाळा मिरजोळी मुख्याध्यापिका मनीषा गर्जे, मधुरा आदावडे. दलवाई स्कुल मिरजोळीचे मुख्याध्यापक रोहित जाधव, वरदान न्यू स्कुल पालपेणे गुहागर मुख्याध्यापक पांडुरंग हासबे,लिटिल चॅम्प इंग्लिश स्कुल जानवेळ गुहागर मुख्याधापक हेमंत शिरकर,सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर, पोफळी शाळा मुख्याधपाक महेंद्र कापडी,जेष्ठ शिक्षक आलोर बिद्रीकोठीमट, जि.प.शाळा ओवळी मुख्याध्यापिका प्रतीक्ष मोहिते, स्नेहल शिंदे, राजेंद्र महाडिक,जि. प. शाळा वालोटी मुख्याध्यापक संतोष कादवडकर मोहन विद्यालय आकले शिक्षिका मनस्वी जोशी.आदि शाळा उपस्थित होत्या. यांनी या कार्यक्रमाचे रांगोळी कडून आनंदाने स्वागत करून उत्तम नियोजन त्या त्या गावात करण्यात आले.माजी सैनिक, महिला,तरुण,शाळेतीला शिक्षक, विद्यार्थी ,पालक, वरिष्ठ मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण फोटोग्राफी आकाश मोहिते यांनी केली. प्रास्थाविक केशव खाडे सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पावर यांनी केले.