कृषि अभियांत्रिकी आणि महाविद्यालयात दंत तपासणी व सल्ला शिबीर संपन्न

दापोली l प्रतिनिधी: राष्ट्रीय सेवा योजना, कृषि अभियांत्रिकी आणि महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली आणि योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी व सल्ला शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व योगिता दंत महाविद्यालय खेड यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या कॉलेजने शिबीरासाठी आवश्यक साधने, तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि दंतवैद्यांची सेवा पुरविली होती. या शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. जी. मोहोड यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी त्यांनी दंत आरोग्याचे महत्व व दातांची घ्यावयाची काळजी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

सुरवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकम अधिकारी प्रा. एम. एच. थारकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या शिबीरात विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी दंत तपासणी करून घेऊन योग्य उपचारासाठी तज्ञाचा सल्ला घेतला.

 

योगिता दंत महाविद्यालयाचे डॉ.वरुणराज जाधव, डॉ. श्रेया कोपनार, डॉ. ओंकार कासरुम व दंत महाविद्यालयाचे पदवी व पदवीत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

 

या शिबीराच्या यशासाठी डॉ. बी.एल.आयरे, प्रा.एम.एच. धारकर, डॉ.प्रकाश कोल्हे, डॉ.एच.एन. भांगे, डॉ. प्रविण बनसोडे, सहाय्यक कुलसचिव अनिल मरकड, कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी आदींनी शिबीराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्रा. थारकर यांनी सर्वांचे आभार मानले.