पालशेत : (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती.रखुमाई पांडुरंग पालशेत कर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये महसूल प्रशासनाच्यावतीने दि.२३ रोजी सकाळी ठीक ११:०० वा.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या हेतूने महसूल विभाग प्रशासनाच्या पालशेत साझाच्यावतीने हे आयोजन करण्यात आले आहे.पालशेत साझाच्या पालशेतसह आडूर, वेळंब,मळण,वेळणेश्वर, पोमेंडी या गावांतील सर्व खातेदार,शेतकरी,विद्यार्थी,महिला आणि नागरिकांना या शिबिराचा लाभ होणार आहे.या शिबिरामध्ये जिवंत ७/१२ टप्पा २ या अनुषंगाने कामकाज व अर्ज स्वीकारणे,७/१२ वाटप,फेरफार अदालत अँग्रीस्टॅक नोंदणी,संजय गांधी निराधार योजना लाभ मंजुरी आदेश,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना लाभ मंजुरी आदेश,जात,रहिवास,अधिवास, उत्पन्न,नॉन क्रिमीलेअर दाखले वाटप,शिधापत्रिका वाटप,भोग वटा वर्ग २ चे वर्ग १ करणेकामी कामकाज,सलोखा योजना, कातकरी समाजातील लोकांना दाखले वाटप,आधार अपडेट, पीएम किसान योजना या व अशा महसूल विभागाच्या विविध सेवा,विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणारी कागदपत्रे तसेच सामाजिक योजनांच्या लाभाचे वितरण
करण्यात येणार आहे.
शिबिरातील महसूल विषयक सेवा व दाखले असा सर्वंकष लाभ घेण्यासाठी पालशेत साझाच्या वेळंब,मळण वेळणेश्वर,पोमेंडी,अडूर या सर्व गावांतील खातेदार,शेतकरी,विद्यार्थी,महिला व नागरिकांनी उपस्थित राहून या शिबीरचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन श्री.प्रशांत कानिटकर,मंडळ अधिकारी पालशेत तसेच पालशेत मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गाने केले आहे.










