ओटवणे (प्रतिनिधी)
ओटवणे मांडवफातर वाडी येथे रामचंद्र विष्णू वर्णेकर यांच्या घरात चोरट्याने घुसून शीताफीने दिवसा ढवळ्या कपाट खोलून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. भर वस्तीत असणाऱ्या या घरात दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने समोरच्या दरवाजाने आत जात आतून दरवाजा लावून घेत कपाट खोलले यावेळी वर्णेकर यांच्या पत्नी रंजना वर्णेकर या शेजारील घरात होते आवाज आला म्हणून त्या घराकडे आल्या त्यावेळी चोर मागच्या बाजूने डोळ्यादेखत पळून गेला. या घटनेपूर्वी ओटवणेत अशा चोरीचे प्रकार बरेच घडले असून पुनः एकदा अशा घटना दिवसा ढवळ्या घडायला लागल्याने ओटवणेत भीतीचे वातावरण भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान वर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नेमकी घटना घडली त्यावेळी रामचंद्र वरणेकर हे माजगाव येथे कामाला गेले होते. तर त्यांची पत्नी रंजना शेजारी गेल्या होत्या. रंजना वर्णेकर यांना आपल्या घरानजिक मोटारसायकल उभी असल्याचे दिसले . पण त्यांना वाटले कुणीतरी घरी आला असेल त्यानंतर त्यांना आवाज आला त्यावेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली.यावेळी चोरट्याने घराचा दरवाजा आतून बंद केला होता.कुणीतरी आल्याचे लक्षात येताच चोरट्याने मागच्या दरवाजाने पलायन केले. चोरट्याच्या हाती घरातील पाच तोळ्याचे दागिने लागले असून सध्याच्या महागाईत सुमारे ५ लाख रुपयाहून अधिक रुपयाचा ऐवज चोरट्याच्या हाती लागल्याने वर्णेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे . पोलीस पाटील शेखर गावकर यांनी घडलेली घटना सावंतवाडी पोलीस ठाण्याला कळविल्या नंतर पोलिस निरीक्षक अमोल चढगण, हवालदार मनोज राजुत यांनी तपास केला. पोलिसांनी श्वान पथकाला देखील पाचारण करून तपास केला. घडलेल्या घटने ने मात्र ओटवणे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्वकष्टाने कमविले पैसे दागिने जर दिवसाढवळ्या चोरीला जात असतील तर नेमके ठेवायचे कुठे असा प्रश्न पडला आहे.












