चिपळूण (वार्ताहर) : अत्यंत कमी कालावधीत परदेशात ट्रेनिंग व नोकरी देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेल्या आकार एज्युकेशन ट्रस्ट संचालित एएचए कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिपळूण या महाविद्यालयात २०२५-२६ मध्ये नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी परदेशात ट्रेनिंग तसेच नोकरीला जात असतात त्या अनुषंगाने सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस कुंटे याचे दुबईमधील स्टार हॉटेल असलेल्या कॉन्टिनेटलमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच ट्रेनिंग दरम्यान उत्कृष्ट कार्य तसेच वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वीरेंद्र अहिरे यांच्या सत्कार करण्यात आला.
प्रा. रोहिणी ओतारी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची तसेच उपलब्ध सुविधांची माहिती दिली. महाविद्यालयामार्फत भारतात तसेच परदेशात ट्रेनिंग व नोकरी संदर्भातील विद्यार्थ्यांना माहिती श्री. ललित कांडवेलकर यांनी दिली. या कार्यक्रमाला सुरेंद्र कदम, संतोष कुळे पत्रकार, हेमंत चव्हाण पत्रकार, आकार एज्युकेशन ट्रस्टच्या चेअरमन व एएचए कॉलेजच्या प्राचार्य सौ. रोहिणी ओतारी तसेच उपाध्यक्ष ललित काडवेलकर, कॉलेजचे उपप्राचार्य सुमित वासनिक, प्राध्यापक रोहन सोमण, प्रा. श्रद्धा तांबे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












