गुहागर प्रतिनिधी
पालपेणे गावचे सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन आज शनिवारी करण्यात आले आहे.
उमेश खैर यांनी स्वतः खूप कमी वयात आतापर्यंत 25 वेळा रक्तदान केले आहे, त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्त हे 8 वे शिबीर आहे.
दरवर्षी गुहागर तालुक्यातील त्याचे मित्र परिवार हे शिबिर आयोजित करत असतात तसेच,याच दिवशी जीवन ज्योती विशेष शाळा याठिकाणी छोटीशी भेटवस्तू देऊन,त्या विशेष मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. गुहागर तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला रक्त हवे असेल तर आजही लोकं हक्काने उमेशला फोन करतातं आणि त्याची रक्ताची गरज उमेश अगदी तत्परतेने करतो.प्रत्येक सर्वसामान्य ,गरजू व्यक्तींना मोफत आणि वेळेत रक्त मिळावे यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील राहतो. आपला वाढदिवस समाजाच्या सार्थकी लागावा म्हणून जिल्हा शासकीय रक्तपेढी रत्नागिरी यांच्या शिबिरात शनिवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत भवानी सभागृह,पालपेणे रोड येथे रक्तदान करून उमेशच्या सामाजिक आणि लोकोपयोगी कार्याला हातभार लावण्याचे आवाहन त्याच्या मित्र परिवार यांनी केले आहे.












