दोडामार्ग l प्रतिनिधी :तळकट ग्रामपंचायत आणि आयुष फाउंडेशन आरोग्य मंत्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत बीएमआय तपासणी आणि मोफत वैद्यकीय तपासणी अहवाल शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १४४ ग्रामस्थ व महिलांनी लाभ घेतला.
तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रमाकांत गवस, सदस्य शशिकांत राऊळ, विवेक मळीक, ग्रामसेवक कुबल, विकास सावंत, रजत देसाई, प्रज्योत देसाई उपस्थित होते.
आयुष फाउंडेशन, आरोग्य मंत्रा ही संस्था महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत हद्दीमधील महिलांसाठी काम करत आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी, आरोग्यम् धनसंपदा हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून असंख्य महिलांना निरोगी राहण्यासाठी फायदा होत आहे. महिलांकरिता उंचीनुसार आपले वजन किती असावे, अतिवजनामुळे होणारे दुष्परिणाम, शरीरांच्या अवयवांवर चरबीचे प्रमाण, स्केलेटल मसल्स, बॉडी मेटाबोलिक एज, विसरल फॅट, त्यांचे बीएमआय रिपोर्ट संस्थेकडून मोफत देण्यात येतात. तसेच अन्य आजार व त्यावरील उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आरोग्य सल्लागार भक्ती घाडीगांवकर, शाखा व्यवस्थापक साहिल दाते, सोहम पिळणकर, तृप्ती घाडीगांवकर, भावनेश धुरी आदींनी तपासणी केली. ग्रामस्थ चंद्रकांत राऊळ, अंकुश वेटे, राघोबा देसाई, संजय वेटे, रामकृष्ण राऊळ, कॣष्णा देसाई, आनंद राऊळ, सदानंद देसाई, दीपक नाटेकर, विठ्ठल साळगावकर, भागिरथी देसाई, सत्यभामा सावंत, शैलेश राऊळ, विठ्ठल देसाई, गोविंद देसाई, कृष्णा सावंत आदींसह गावातील १४४ जणांनी लाभ घेतला.
———-












