रत्नागिरी /वार्ताहर
सन 2025 /26 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मूल्यवर्धन जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण सोमवार दिनांक 28 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. मात्र श्रावणातील पहिला सोमवार आणि मंगळवारी नागपंचमी सण असल्यामुळे अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप देवळेकर सर यांनी शिक्षकांचे अडचण लक्षात घेऊन आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार उदय जी सामंत साहेब यांची पाली या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर अडचण लक्षात आणून दिली आणि हे प्रशिक्षण सोमवारी दिनांक 28 जुलै 2025 पासून कालावधीत न घेता बुधवार दिनांक 30 जुलै 2025 पासून घेण्यासंबंधी विनंती वजा सूचना केली. सदर विनंतीची नामदार उदयजी सामंत साहेबांनी तात्काळ दखल घेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना भ्रमण द्वारी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून सदर प्रशिक्षण सोमवारी 28 जुलै 2025 ऐवजी न घेता बुधवार दिनांक 30 जुलै 2025 पासून सदर प्रशिक्षण घेण्यासंबंधी विनंती वजा सूचना केली. सदर विनंतीची नामदार उदयजी सामंत साहेबांनी तात्काळ दखल घेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भ्रमणधरीदारा संपर्क करून सदर प्रशिक्षण सोमवार ऐवजी बुधवारपासून आयोजित करण्याचे निर्देश दिले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनी तात्काळ प्राचार्य डाएट रत्नागिरी यांना प्रशिक्षण बुधवार 30 जुलै 2025 पासून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.
अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्राथमिक शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी कटीबद्ध आहे याची प्रचिती जिल्हाध्यक्ष श्री दिलीप देवळेकर सर यांनी आपल्या आजच्या कार्यातून दाखवून दिली आहे आणि आपल्या वेगवान कामाची प्रचिती दिली आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षकांकडून अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.











