उपोषणाची दखल घेतली!
शेतकरी यांनी मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार
दोडामार्ग सुहास देसाई
तिलारी प्रकल्पग्रस्त शेतकरी बाबुराव पोकळे यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर बांधली होती त्याची साहित्य व अन्य रक्कम वेळोवेळी पाठपुरावा करून रक्कम जमा करण्यात आली नव्हती गेले दहा वर्षे ते पाठपुरावा करत होते यापूर्वी अनेक शासन, लोकप्रतिनिधी यांचे कडे पाठपुरावा केला त्याची कोणीच दाखल घेतली नव्हती मात्र याबाबत त्यांनी अलीकडे उपोषण देखील केले होते त्यावेळी सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी तातडीने दखल घेत आश्वासन दिले होते त्यानंतर राज्य स्तरावर सदर रक्कम प्रलंबित होतीअशी माहिती समोर आली यांनतर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
मात्र या प्रकरणात पालकमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी गाभियाने लक्ष घातल्याने जिल्ह्यातील अशा अनेकांच्या विहीर व अन्य कामांची प्रलंबित रक्कम जमा होऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे याबाबत यापूर्वी संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांना दिले होते. त्यांनी आपल्या राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला त्यानंतर तातडीने प्रशासनाची सर्व सूत्रे हलली व बाबुराव पोकळे यांच्या खात्यात त्यांना देय असलेली रक्कम जमा झाली. ना नितेश राणे साहेबांनी आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला असून सिंधुदुर्ग जि. प. तसेच दोडामार्ग पंचायत समिती प्रशासनातील सर्व अधिकारी खातेप्रमुख तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, मनरेगा चे गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आदींचे सहकार्य मिळाल्याचे श्री. पोकळे यांनी सांगितले आहे.
लाभार्थींनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार….
दरम्यान ओरोस येथे आज शनिवारी जनता दरबार च्या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगरसेवक संतोष नानचे, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले उपस्थित होते.













