डीपी प्लॅन रद्द होण्याबाबत मंत्री नितेश राणे यांच्याशी सकारात्मक चर्चा

लांजा कुवे संघर्ष समितीच्या वतीने श्री देव चव्हाटा मंदिर येथे जल्लोष
संतोष कोत्रे

लांजा : लांजा कुवे संघर्ष समितीचा विजय असो, डीपी प्लॅन प्लॅन रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत लांजा कुवे संघर्ष समितीच्या वतीने रविवारी श्री देव चव्हाटा मंदिर येथे जल्लोष करण्यात आला.
लांजा कुवे येथील नागरिकांवर लांजा नगरपंचायतीच्या वतीने लादण्यात आलेल्या डीपी प्लॅन संदर्भात आज लांजा कुवे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी लोकांच्या मागणीला प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकांचा विरोध असेल तर डीपी प्लॅन रद्द केला जाईल. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा करीन असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी लांजा कुवे संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांना दिले आहे.
याबद्दल आज रविवारी सकाळी लांजा गावचे जागृत देवस्थान श्री देव चव्हाटा मंदिर या ठिकाणी लांजा कुवे संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि दोन्ही गावातील नागरिक यांनी एकत्र येत डीपी प्लॅन रद्द होण्यासाठी श्री देव चव्हाटा ला साकडे घातले. यानंतर मंत्री नितेश राणे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चा बद्दल जल्लोष व्यक्त करण्यात आला..
लांजा कुवे संघर्ष समितीच्या एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतो होणार नाही, रद्द झाल्याशिवाय राहणार नाही, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. संघर्ष समिती अध्यक्ष प्रकाश लांजेकर व सर्व पदाधिकारी आणि लांजा- कुवे येथील नागरिक उपस्थित होते.