सावंतवाडी : सावंतवाडी उभा बाजार येथील रहिवासी आणि शिक्षण खात्याचे निवृत्त अधिकारी अरुण वामन स्वार (७२, रा. विठ्ठल मंदिर लगत, सावंतवाडी) यांचे आज सकाळी सहाच्या सुमारास मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मसुरकर कुटुंबांमध्ये शोककळा पसरली आहे.
अरुण स्वार हे शिक्षण खात्यात सेवेत होते आणि काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, दोन बहिणी, भाऊ, भावजया आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. ते प्रकाश स्वार आणि रवींद्र स्वार यांचे बंधू होत.
त्यांचा अंत्यविधी मुंबईतच पार पडला असून, पुढील दशक्रिया विधी आणि इतर धार्मिक कार्ये सावंतवाडी येथे केली जातील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.













