वैभववाडी भाजपाची नूतन कार्यकारणी जाहीर 

अध्यक्षपदी सुधीर नकाशे : तसेच ६ उपाध्यक्ष, २ सरचिटणीस, ६ चिटणीस नव्याने नियुक्त 

कार्यकारणीत ५९ जणांचा समावेश

वैभववाडी l प्रतिनिधी :

वैभववाडी भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत ५९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्षपदी सुधीर गणपत नकाशे, तसेच या कार्यकारिणीत ६ उपाध्यक्ष, २ सरचिटणीस, ६ चिटणीस काम पहाणार आहेत. सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस संदीप साटम यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, प्राची तावडे, संजय सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.

नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष सुधीर गणपत नकाशे, उपाध्यक्ष अंबाजी भागू हुंबे, पुंडलिक सहदेव साळुंखे, हुसेन बादशहा लांजेकर, अक्षता सूर्यकांत डाफळे, अभय बाळकृष्ण कांबळे, अनुज्ञा अंकुश आंगवलकर, सरचिटणीस संजय दिगंबर सावंत, रितेश गणपत सुतार, चिटणीस मानसी नितीन रावराणे, रामदास गोविंद पावसकर, रवींद्र अनंत इंदुलकर, कांचन मधुकर कांबळे, भीमराव हरिश्चंद्र भोसले, रेखा शांताराम खाडये, कोषाध्यक्ष स्वप्निल बाळासाहेब खानविलकर, सदस्य वसंत तात्या पवार, देवानंद बाळकृष्ण पालांडे, रत्नाकर गणपत कदम, आकाराम यशवंत नागप, बाजीराव अमृत मोरे, योगेश रमेश पाथरे, शिवाजी नानू नाटेकर, सुनील काशिनाथ कांबळे, सचिन गोपाळ महाजन, जयराम हरयाण, काशीम बिलाल रमदुल, प्रमोद शांताराम सावंत, अरुण बाबाजी कदम, सुनील श्रीपत रावराणे, महेश शंकर गोखले, अनंत भिकाजी नेवरेकर, नंदकुमार पुनाजी आमरसकर, विलास विठोबा वळंजु, प्रदीप रामचंद्र नारकर, उमेश वामन पवार, भरत शांताराम मांजलकर, संजय सखाराम चव्हाण, रवींद्र बाळकृष्ण रावराणे, विजय विनायक रावराणे, उज्वल सहदेव नारकर, जयसिंग हनुमंत रावराणे, रमेश तुकाराम गुरव, मंगेश हरिश्चंद्र गुरव, लहू रामकृष्ण पवार, सचिन बळीराम तळेकर, प्रीती प्रकाश यादव, दक्षता गणपत सकपाळ, रेखा रवींद्र सरफरे, स्वरा दिलीप काडगे, श्रावणी श्रीकांत खाडये, लक्ष्मी दिलीप म्हेतर, पूजा जितेंद्र रावराणे, सानिका सुनील रावराणे, सुप्रिया राजन तांबे, सुषमा राजेश सरवणकर, पूर्णिमा चंद्रकांत सावंत, उन्नती उत्तम पावले, दर्पणा दशरथ बोबकर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे संदीप साटम यांनी अभिनंदन केले.