जनतेला सुरक्षित व अधिक सुखकर प्रवास सुविधा देण्यास कटिबद्ध – आ.किरण सामंत
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून राजापूर एस.टी. आगाराला पाचल नवीन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या एस.टी. बसेस उपलब्ध झाल्या असून, त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या नवीन बसेसमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, वयोवृद्ध, नोकरदार नागरिक प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
मागील काही काळापासून तालुक्यातील अनेक मार्गांवर एस.टी.बस ची संख्या अपुरी पडत होती, यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. हे अडचण लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन बसेसची मागणी केली होती, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाच नवीन कोऱ्या बसेस राजापूर आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ.किरण सामंत यांनी बोलताना “या नवीन बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार असल्याचे सांगत, जनतेला सुरक्षित व अधिक दर्जेदार प्रवास सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
याप्रसंगी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, शहरप्रमुख सौरभ खडपे, सौ. हर्षदा खानविलकर, उप तालुकाप्रमुख चंद्रकांत जानस्कर, विभागप्रमुख नाना कोरगावकर, अमर जाधव, महेश कारेकर, मा.नगरसेवक संजय ओगले, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, रविंद्र बावधनकर व नागरिक उपस्थित होते.
फोटो 28 आरजेपी 3
राजापुर आगारातील नवीन बस लोकार्पण सोहळया प्रसंगी आ. किरण सामंत यांसह एसटीचे अधिकारी व अन्य मान्यवर.












