खेड – ( प्रतिनिधी )दिनांक – 29 जुलै 2025
मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेेडच्या बालवाटिका विभागात नागपंचमीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पावित्र्य आणि मांगल्याची जोपासना करणारा श्रावण महिना यात व्रतवैकल्यांची रेलचेल असते. या महिन्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेचे महत्त्व सांगतो. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करुन नागदेवतेला प्रसन्न करण्याची पध्दत आहे. असा हा नागपंचमीचा कार्यक्रम रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात साजरा केला.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्चमाध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नागदेवतेची पूजा केली.
पूर्वप्राथमिक विभागातील शिक्षिका सौ. राधिका घोडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, नाग हा शेतातील उंदीर पळवून लावतो त्यामुळे नाग शेतकर्याचा मित्र आहे असे मानले जाते. आपण ज्याप्रमाणे माणसाची काळजी घेतो त्याप्रमाणेच प्राणीमात्रांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना जपले पाहीजे असे सांगितले. त्यानंतर नागदेवतेची पूजा करुन त्याला दूध – लाह्या व मोदकाचा नैवद्य दाखवण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या नागपंचमीच्या कार्यक्रमासाठी रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील सर्व शिक्षिकांनी मेहनत घेतली.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नागपंचमीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या











