साम्राज्य ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

चिपळूण (वार्ताहर) : साम्राज्य ग्रुप फाउंडेशन कोकण विभागातर्फे तालुक्यातील खेर्डी येथील संजीवनी सर्जिकल व जनरल हॉस्पिटलमध्ये सोमवार दि. २८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुळव्याध व पोटविकार तज्ञ डॉ. अक्षय विजय यादव व स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. पूजा ओंकार भुरण यांनी उत्तम सेवा दिली.
साम्राज्य ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही विधायक शैक्षणिक, सामाजिक व अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. या शिबिरात डॉ. अक्षय विजय यादव व स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. पूजा ओंकार भुरण यांनी रूग्णांना सल्ला, उपचार व मार्गदर्शनदेखील केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी साम्राज्य ग्रुप फाउंडेशनचे पदाधिकारी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनायक शिरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय पवार, जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धार्थ पोळ, चिपळूण तालुकाध्यक्ष अथर्व घाग, तालुका उपाध्यक्ष तेजस मोरे, तालुका सचिव समीर शिंदे, सहसचिव नारायण येलकर, प्रसिद्धी प्रमुख आर्यन मोहिते, सहमीडिया पियुष कदम, कोकण अध्यक्ष अक्की जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.