चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघात नागपंचमीच्या दिवशी श्रावणी (जानवे बदलणे) हा उपक्रम संपन्न होतो, तसाच यावर्षीही मंगळवार दि. २९ रोजी सकाळी श्रावणी कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचे संचालन यावर्षी वे.मु. मयुरेश परांजपे यांनी केले. यापूर्वी कै. दिनकर शास्त्री फडके ही जबाबदारी पार पाडीत असत. यावर्षी त्यांची आठवण सर्वाना आली.वे. मु. मयुरेश परांजपे हे त्यांचेच पट्टशिष्य आहेत.
या उपक्रमाला एकूण १८ ब्रह्मवृंद उपस्थित होते. आठ वर्षाच्या बटू माधव आगवेकरपासून ८७ वर्षांच्या श्रीकृष्ण तथा आप्पा आगवेकर या वयोगटातील ब्रह्मवृंद होते. सकाळी ७.३० वा सुरु झालेला कार्यक्रम ९.३० वाजेपर्यंत चालला. या कार्यक्रमाची पूर्ण तयारी संचालक आणि सचिन चितळे तसेच वीरेश्वर भक्त विश्वास देवधर यानी केली. होम ककुंडासाठी कोरडी माती कृषिक्रांती सेवा केंद्राचे निखील भोसले यानी दिली. काही सामान संजीव खरे यांनी दिले. सर्वांना अल्पोपाहार आणि सौ. चौघुले यांनी प्रायोजित केला. चहापानाची व्यवस्था स्वागत हॉटेलचे मालक ऋषी बापट यांनी केली. पूजा साहित्यासाठी आनंद चितळे यांनी सहकार्य केले. सर्व कार्यक्रम यथासांग पार पडला. कार्यक्रमाला संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम प्रायोजित करणारे चंदू अभ्यंकर आवर्जून उपस्थित होते.












