राजापूरात १० ऑगस्ट रोजी राजापूर तालुका चॅम्पियन खुल्या बुध्दीबळ रॅपीड स्पर्धेचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): राजापूर रॉयल चेस अॅकॅडमी यांच्या वतीने रविवार दि. १० ऑगस्ट रोजी राजापूर तालुका चॅम्पियन खुल्या बुध्दीबळ रॅपीड स्पर्धेचे आयोजन एम. एस. क्लासेस धोपेश्वरघाटी राजापूर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या हस्ते होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ सायं.४ वाजता होणार आहे.
स्पर्धेसाठी वेळ मर्यादा – १५. मि. ५ से. स्विस लिग ७ राऊंड असणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रोख रू. २०००, द्वितीय विजेत्यास रोख रू.१५०० व तृतीय विजेत्यास रोख रू. १ हजार व चषक देवून गौरविण्यात येणार आहे.
तसेच वयोगट ९/११/१३ मुली आणि मुलगे यांसाठी स्पर्धा होणार असून अधीक माहिती व नाव नोंदणीसाठी मोहसीन सय्यद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजापूर रॉयल चेस अँकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.