लांजा (प्रतिनिधी): लांजा साटवली या कायम वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
साठवली रस्त्यावरील कोंडये गावातून साटवलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर गटार नसल्यामुळे पाणी साचून खड्डे पडले आहेत. यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात देखील होत आहेत. या प्रकरणी कोंडये ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज चंदुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा यांना लेखी पत्र सुद्धा दिले आहे. लांजा साटवली इसवली रस्ता रा.मा.क्र.१६८ हा रस्ता कोंडये ग्रामपंचायत हद्दी मधून जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गटार अपूर्ण असल्यामुळे व साईट व गटारावर अतिक्रमण झाल्यामुळे होणाऱ्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
असे असले तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, लांजा यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर साईट पट्टी रस्त्यावर पडलेले खड्डे हे तात्काळ बुजवण्यात यावे.
तसेच कोंडये येथे असलेले गतिरोधक हे दिसण्यात येत नसल्यामुळे त्याचे वरती कलर पट्टा करण्यात यावा व ते व्यवस्थित नीटनेटके दिसतील ह्या हेतूने कामकाज करावे अशी मागणी कोंडये सरपंच मनोज चंदुरकर यांनी केली आहे.












