चिपळूण (वार्ताहर) : वंचित बहुजन आघाडी पक्षाची सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी चिपळुणात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शहरातील बावशेवाडी येथील महाबोधी बुध्द विहार येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजता ही बैठक होणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाचे राज्यात जोमाने काम सुरु आहे. चिपळूण पक्षाचा बालेकिल्ला करण्याचे येथील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे स्वप्न असून त्यासाठी रणनिती आखली जाणार आहे. भारिप बहुजन महासंघ पक्ष (आता नावात बदल वंचित बहुजन आघाडी) २००२ साली स्थापन झाल्यावर चिपळुणात देखिल पक्षाचे जोमाने काम सुरु झाले होते. जिल्ह्यात चिपळुणात लक्षवेधी असे काम पदाधिकारी व कार्यकर्ते करीत होते. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेत वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली. चिपळुणात वंचितची पक्ष संघटना बांधणीसाठी सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी चिपळुणात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही चर्चा करुन रणनिती आखली जाणार आहे. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची मोठ बांधली जाणार आहे. तरी सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीधर सकपाळ, सुभाष जाधव, महेश सावंत, विनोद कदम, सुशांत जाधव, राजू जाधव (बावशेवाडी), संदिप गमरे, सुधाकर पवार, संदेश कदम, सुरेश भिसे यांनी केले आहे.











