रुण पराडकरवाडी येथील घटना, तरुणावर गुन्हा दाखल
लांजा( प्रतिनिधी) शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या घरात घुसून त्याच्या घराच्या कपाटातील ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्या प्रकरणी रूण पराडकरवाडी येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही घटना दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी ७ ते दिनांक २४ जुलै २०२५ सायंकाळी ७ या कालावधीत रूण पराडकरवाडी येथे घडली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची तक्रार प्रणय संजय पराडकर (वय २५, राहणार रुण पराडकरवाडी) त्याने लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शेजारी राहणाऱ्या ऋषिकेश अंकुश पराडकर (वय २७ वर्षे राहणार रुण पराडकरवाडी) याने वरील कालावधीमध्ये प्रणय पराडकर याच्या घराला घराचे दरवाजा लावलेले कुलूप चावीने उघडून त्याच्या घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची व ५ ग्रॅम वजनाची
सोन्याची चैन चोरून नेली. याबाबत प्रणय पराडकर याने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ऋषिकेश अंकुश पराडकर याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर हे करत आहेत.










