चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयामध्ये हिंदी विभागा तर्फे ‘हिंदी दिवस समारोह’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून डॉ.हेमलता विजय काटे, सहयोगी प्राध्यापिका, बाळा साहेब देसाई महाविद्यालय, पाटण या उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात ‘हिन्दी : वर्तमान परिदृश्य’ या विषयावर बोलताना त्यांनी हिंदी भाषेचा इतिहास आण डिजीटल युगात हिंदी भाषेचे महत्व व्यक्त केले. प्राचार्यडॉ.एम.एस.बापट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी भाषेचे महत्व सांगितले. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. विक्रम वारंग यांनी केले तसेच अतिथि परिचय प्राध्यापिका संयोगिता माळी यांनी केला. या प्रसंगी रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांनी आपल्या शायराना अंदाजा ने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.सी.सी आठवले उपस्थित होते. हिंदी दिना निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय हिंदी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील विविश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दीक्षा टेरवकर ने केले तर आभार कु.स्नेहाली भोसले हिने मानले. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी प्रतिनिधी कु.जय जाधव व हिन्दी विभागच्या विद्यार्थ्यांनी केले.











